Sunday, February 26, 2012

तुझी आठवण म्हणजे वाऱ्यासारखी


तुझी आठवण म्हणजे वाऱ्यासारखी 
नेहमी माझ्याच अवती भवती 
कधी सतवते कधी फसवते 
एकटा असलो तरी हसवते
प्रश्न पडतो कुणासारखी 
तुझी आठवण म्हणजे वाऱ्यासारखी .......
साथ कधीच सोडत नाही 
सोबत नेहमीच असते 
डोळे मिटून मिठीत घेतो 
तेव्हा मात्र लाजते 
रात्री कशी लाडीकपणे 
बिलगून मलाच झोपतेस
सकाळी डोळे उघडताच असतेस 
जणूकाही तुच मला उठवतेस 
दूर असलो तुझ्या तरी 
का तू नेहमीच जवळ भासतेस 
मग प्रश्न पडतो कुणासारखी 
तुझी आठवण म्हणजे वाऱ्यासारखी .......
टपोरे डोळे गोंडस चेहरा
गोड आवाज लाजरा हसरा 
जसे चंद्र नाचवतो अथांग सागरा
तुझी आठवण म्हणजे तसाच वारा......

                                                - योगेश सुखटणकर 

Thursday, December 29, 2011

कोंडी झालीये नुसती


ना इथून काही आशा न तिथून काही आधार
उगाच चुका आणि चुकाच दिसू लागल्यात
काय करावं आणि कसं हेही विचार बंद झालेत
बघतोय सांर नुसताच हतबल होऊन
खरंच कोंडी झालीये नुसती......

एक निवड म्हटलं तरी कठीण आहे फार
एक मैत्री आणि दुसरं प्रेम एक सवय आणि दुसरं स्वप्नं
स्वप्नं पडणं सवयच होती
आणि स्वप्नं मोडलं तरी सवय होतीच
खरंच कोंडी झालीये नुसती......

समजून घ्या असं बोलणही ऐकू येत नाहीये 
कारण सगळेच निर्णय झालेत बहुतेक
सगळेच तसे माझेच आहेत सारे
तरी माझं कोणीच नाही असं वाटतंय
खरंच कोंडी झालीये नुसती.........

                     - योगेश सुखटणकर 

Sunday, May 22, 2011

आई


माझं माझ्या आईवर प्रेम आहे
असं म्हणणंच कमी झालंय
आईवरच प्रेम दाखवणं
इतकं का अवजड झालंय


              - योगेश सुखटणकर 

Thursday, April 14, 2011

चहाच्या कपातली वाफ म्हणे


चहाच्या कपातली वाफ म्हणे
क्षणभंगुरच ते अस्तित्व माझं
रोजचच तरंगण आणि विरून जाण
क्षणातच असण आणि तसचं नसण

                 - योगेश सुखटणकर 

या आयुष्याची दिशा काय


या आयुष्याची दिशा काय
सरळ रेष ही नागमोडी जाय
मिळतील मार्ग ठाऊक नाय
कि जावे तिथेच नेतील पाय
                          -योगेश सुखटणकर

दुमडलेल पान


पुस्तकाचे दुमडलेल पान नसतं इतकं महत्वाच 
तरी इतर पानांना वाटत तेच काय ते हुकुमाच
दुमडलेला उघडत आणि नवीन परत दुमडत
आज नवीन उद्या जुनं हे सुरूच असतं 
कोणीच नसतं खरच.... इतक महत्वाचं !!!
                                    - योगेश सुखटणकर

खरच सोप्पा नसतं...


जगण्या पेक्षा मरणाचीच चर्चा चाललीय जास्त
इच्छा नाही.. तरी दयामरण आहे का खरच रास्त
जगवायचा कसं या पेक्षा मरणच होतं स्वस्त
पण जगण अन् मरण खरच सोप्पा इतकं का असतं????
                      -योगेश सुखटणकर.