Thursday, December 29, 2011

कोंडी झालीये नुसती


ना इथून काही आशा न तिथून काही आधार
उगाच चुका आणि चुकाच दिसू लागल्यात
काय करावं आणि कसं हेही विचार बंद झालेत
बघतोय सांर नुसताच हतबल होऊन
खरंच कोंडी झालीये नुसती......

एक निवड म्हटलं तरी कठीण आहे फार
एक मैत्री आणि दुसरं प्रेम एक सवय आणि दुसरं स्वप्नं
स्वप्नं पडणं सवयच होती
आणि स्वप्नं मोडलं तरी सवय होतीच
खरंच कोंडी झालीये नुसती......

समजून घ्या असं बोलणही ऐकू येत नाहीये 
कारण सगळेच निर्णय झालेत बहुतेक
सगळेच तसे माझेच आहेत सारे
तरी माझं कोणीच नाही असं वाटतंय
खरंच कोंडी झालीये नुसती.........

                     - योगेश सुखटणकर 

Sunday, May 22, 2011

आई


माझं माझ्या आईवर प्रेम आहे
असं म्हणणंच कमी झालंय
आईवरच प्रेम दाखवणं
इतकं का अवजड झालंय


              - योगेश सुखटणकर 

Thursday, April 14, 2011

चहाच्या कपातली वाफ म्हणे


चहाच्या कपातली वाफ म्हणे
क्षणभंगुरच ते अस्तित्व माझं
रोजचच तरंगण आणि विरून जाण
क्षणातच असण आणि तसचं नसण

                 - योगेश सुखटणकर 

या आयुष्याची दिशा काय


या आयुष्याची दिशा काय
सरळ रेष ही नागमोडी जाय
मिळतील मार्ग ठाऊक नाय
कि जावे तिथेच नेतील पाय
                          -योगेश सुखटणकर

दुमडलेल पान


पुस्तकाचे दुमडलेल पान नसतं इतकं महत्वाच 
तरी इतर पानांना वाटत तेच काय ते हुकुमाच
दुमडलेला उघडत आणि नवीन परत दुमडत
आज नवीन उद्या जुनं हे सुरूच असतं 
कोणीच नसतं खरच.... इतक महत्वाचं !!!
                                    - योगेश सुखटणकर

खरच सोप्पा नसतं...


जगण्या पेक्षा मरणाचीच चर्चा चाललीय जास्त
इच्छा नाही.. तरी दयामरण आहे का खरच रास्त
जगवायचा कसं या पेक्षा मरणच होतं स्वस्त
पण जगण अन् मरण खरच सोप्पा इतकं का असतं????
                      -योगेश सुखटणकर.

द्यावं सोडून


जे आपला वाटतं त्याला अलगत द्यावं सोडून
परत आलं तरच खर आपलं, असं म्हणतात
पण आपणच नसलो तिथे,सोडलं सारं जिथून..
मग कोणाला आपलं आणि कोणाला परक म्हणतात??
                          -योगेश सुखटणकर

तू


रोज यायचीस हसत मुरडत
जायचीस देऊन स्वप्न सुंदर
सवयच झालीये तुझ्या येण्याची
नसलीस कि नुसतच वाढतं अंतर
                          -योगेश सुखटणकर

जीवन


रात्रीनंतर उगवते म्हणून ती पहाट असते, 
वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते, 
क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते, 
आसवानी जोडले जाते म्हणून ते प्रेम असते,
क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते

उगाच TP


दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही... 
facebook वर मी येतो आणि बघतो, 
उगाच काही comments करूनी जातो,
त्या comments ना काही किंमत नाही 
facebook चा फायदा होई....
दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही....
                                                                        --योगेश

नसतं तेच हवं असतं


जे नसतं तेच का हवं असतं
जे असतं ते नेहमीच दुर्लक्षित का असतं
नेहमी असंच का असतं
असलेल्याची किंमत नसते
नसलेल्याचा नुसता हट्ट असतो
नसलेल्याच्या ओढी पायी
असलेलं दुय्यम झालेलं असतं
पण असलेलं नेहमीच असतं
आणि नसलेलं कधीच नसतं
कधी कधी आपलं असलेलं
दुसऱ्याचा नसलेलं असू शकतं
तरी नसलेल्याचच महत्व जास्त का असतं
असलेल्याने नसलेल्याच दुःख विसरता येऊ शकता
पण दुःख कुरवाळण्यातच आपण अडकलेले का असतो?
                                                                  -योगेश सुखटणकर 

भ्रम


कोणी खरच कोणाचंच नसतो
सगळा नुसता मनाचा खेळ असतो
जो तो स्वतःच्याच जगात असतो
आपण मात्र उगाच भ्रमात असतो
                             -योगेश सुखटणकर 

एकांत आणि मी


आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी..
पहाटे.. किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’,
असंच काहीसं बडबडतो..
खिडकीचा पदर बाजूला सारतो,
तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं…
तेव्हा त्याला मी हळूच सांगतो
की ‘तिच्या’ डोळ्यांतही
असंच काहीतरी असतं.
तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला
तो पुन्हा मागे खेचतो..
मी पापण्यांतले थेंब वेचतो..
                       -- मराठी कविता संग्रह