तुझी आठवण म्हणजे वाऱ्यासारखी
नेहमी माझ्याच अवती भवती
कधी सतवते कधी फसवते
एकटा असलो तरी हसवते
प्रश्न पडतो कुणासारखी
तुझी आठवण म्हणजे वाऱ्यासारखी .......
साथ कधीच सोडत नाही
सोबत नेहमीच असते
डोळे मिटून मिठीत घेतो
तेव्हा मात्र लाजते
रात्री कशी लाडीकपणे
बिलगून मलाच झोपतेस
सकाळी डोळे उघडताच असतेस
जणूकाही तुच मला उठवतेस
दूर असलो तुझ्या तरी
का तू नेहमीच जवळ भासतेस
मग प्रश्न पडतो कुणासारखी
तुझी आठवण म्हणजे वाऱ्यासारखी .......
टपोरे डोळे गोंडस चेहरा
गोड आवाज लाजरा हसरा
जसे चंद्र नाचवतो अथांग सागरा
तुझी आठवण म्हणजे तसाच वारा......
- योगेश सुखटणकर