अंतरंग
Thursday, April 14, 2011
चहाच्या कपातली वाफ म्हणे
चहाच्या कपातली वाफ म्हणे
क्षणभंगुरच ते अस्तित्व माझं
रोजचच तरंगण आणि विरून जाण
क्षणातच असण आणि तसचं नसण
- योगेश सुखटणकर
या आयुष्याची दिशा काय
या आयुष्याची दिशा काय
सरळ रेष ही नागमोडी जाय
मिळतील मार्ग ठाऊक नाय
कि जावे तिथेच नेतील पाय
-योगेश सुखटणकर
दुमडलेल पान
पुस्तकाचे दुमडलेल पान नसतं इतकं महत्वाच
तरी इतर पानांना वाटत तेच काय ते हुकुमाच
दुमडलेला उघडत आणि नवीन परत दुमडत
आज नवीन उद्या जुनं हे सुरूच असतं
कोणीच नसतं खरच.... इतक महत्वाचं !!!
- योगेश सुखटणकर
खरच सोप्पा नसतं...
जगण्या पेक्षा मरणाचीच चर्चा
चाललीय
जास्त
इच्छा
नाही..
तरी
दयामरण
आहे का
खरच रास्त
जगवायचा
कसं
या
पेक्षा
मरणच
होतं
स्वस्त
पण
जगण
अन्
मरण
खरच
सोप्पा
इतकं
का अ
सतं????
-योगेश सुखटणकर.
द्यावं सोडून
जे आपला वाटतं त्याला अलगत द्यावं
सोडून
परत आलं तरच खर आपलं, असं म्हणतात
पण आपणच नसलो तिथे
,सोडलं
सारं जिथून
..
मग कोणाला आपलं आणि कोणाला
परक
म्हणतात
?
?
-योगेश सुखटणकर
तू
रोज यायचीस हसत मुरडत
जायचीस देऊन स्वप्न सुंदर
सवयच झालीये तुझ्या येण्याची
नसलीस कि नुसतच वाढतं अंतर
-योगेश सुखटणकर
जीवन
रात्रीनंतर
उगवते
म्हणून
ती
पहाट
असते
,
वळणावळणाची
असते
म्हणून
ती
वाट
असते
,
क्षितिजापाशी
झुकते
म्हणून
ते
आकाश
असते
,
आसवानी
जोडले
जाते
म्हणून
ते
प्रेम
असते
,
क्षणोक्षणी
रंग
बदलते
म्हणून
ते
जीवन
असते
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)